National Scholarship Exam
नॅशनल स्कॉलरशिप परीक्षा
राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा
1 ली ते इ. 5 वी साठी (मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यम)NSE ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावरील मराठी, इंग्रजी, गणित, बुध्दिमत्ता व विज्ञान विषयांवर आधारीत प्रश्न व त्याला चार पर्याय या स्वरुपाची आहे. या चार पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे.
ही परीक्षा 200 गुणांची असेल. प्रश्न पत्रिकेचे स्वरूप पुढील प्रमाणे मराठी 10 प्रश्न, इंग्रजी 10 प्रश्न, गणित 30- प्रश्न, बुद्धिमत्ता 30 प्रश्न व विज्ञान 20 प्रश्न एका प्रश्नस 2 गुण दिले जातील.
पात्रता: NSE ही परीक्षा इ. 1 ली ते 5 वी मधील मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम किंवा इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी देऊ शकतात.
या NSE परीक्षा मालिकेया मुख्य महत्वाचा हेतू म्हणजे कठीण उदाहरणे सोडविण्यासाठी सर्वात सोपी पध्दत विकसित करणे आणि भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना पात्र बनवणे.परीक्षेचे फायदे - NSE ही परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारीत असून विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यास करावा यासाठी परीक्षेचे नियोजन केले आहे. या परीक्षेमुळे मुलांची स्पर्धात्मक तयारी होऊन गुणवत्तेत वाढ होते. म्हणूनच आपल्या मुलांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार करायचे असेल तर, त्यासाठी ही परीक्षा उत्तम पर्याय आहे.
अभ्यासक्रम - NSE परीक्षेसाठी इ. 1 ली ते इ. 5 वी अशा प्रत्येक वर्गासाठी अभ्यासक्रम वेगवेगळा आहे. प्रत्येक इयत्तेसाठी अभ्यासक्रमाचे स्वतंत्र पुस्तक तयार केले आहे. त्यामध्ये पुर्णपणे अभ्यासक्रम दिला आहे. शिवाय सोडविलेली व सोडविण्यासाठी उदाहरणे दिलेली आहेत सोबत सरावासाठी प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत.
परीक्षा फी व तारीख - NSE या परीक्षेची परीक्षा फी रु. 50/- व इतर सुविधा शुल्क रु.400/- असे राहील, परीक्षा रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी असेल. काही अपरिहार्य कारणाने परीक्षेच्या तारखेमध्ये बदल होऊ शकतो. तो हक्क संस्थेकडे राखीव आहे